काश्मीरचे वर्तमान (भाग १)
काश्मीर, हिंसा, काश्मिरी पंडित, मुस्लिमप्रश्न —————————————————————————– भारत-पाक फाळणीला आता 70 वर्षे होतील. पण काश्मीरमधील पेचप्रसंगाने ही जखम अजूनही भळभळती ठेवली आहे. गेले सहा महिने तर तेथे कर्फ्युच लागलेला होता. लष्करी बळावर आपण काश्मीर भारतात भौगोलिक दृष्ट्या राखू शकू. पण त्यातून उद्भवणारे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न आपली पाठ सोडणार नाहीत. थेट काश्मीरला जाऊन तेथील विविध जनसमुहांशी थेट …